अभ्यासकांचा जावईशोध; अल्कोहोल सेवनाने वाढते स्मरणशक्ती !


लंडन: शरीराला अल्कोहोल सेवन केल्यामुळे होणा-या नुकसानांबद्दल तर तुम्ही बरच ऎकले असेल. पण याचे अनेक फायदेही असतात हे जाणून घेतल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. जर कोणती गोष्ट तुमच्या लक्षात राहत नसेल तर ही समस्या दूर करण्यासाठी अल्कोहोल तुमची मदत करू शकते. म्हणजेच अल्कोहोल तुमची स्मरणशक्ती वाढवण्यात मदत करते असा खुलासा नुकत्याच समोर आलेल्या एका रिसर्चमधून झाला आहे. या रिसर्चमध्ये अल्कोहोलच्या सेवनामुळे तुम्हाच्या जास्त लक्षात राहते आणि हे लक्षात ठेवण्यासाठी याची मोठी मदत होते, असे म्हटले आहे.

ब्रिटनची युनिव्हर्सिटी ऑफ एक्सिटरमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात असा दावा करण्यात आहे की, जर ड्रिंकींग सेशनच्या आधी एखादी सूचना किंवा माहितीला जाणून घेतले तर अल्कोहोलमुळे ती सूचना जास्त काळापर्यंत लक्षात राहते. कारण अल्कोहोल आपल्या लक्षात ठेवण्याच्या शक्तीला वाढवण्यात मदत करते. अभ्यासकांनी त्याचबरोबर या गोष्टीवरही जोर दिला आहे की, आपल्या शरीरासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी अल्कोहोलचे जास्त सेवन हे हानिकारक आहे.

अभ्यासकांच्या रिसर्च दरम्यान, १८ ते ५३ वयोगटातील ८८ सोशल ड्रिंकर्स ज्यात ३१ पुरूष आणि ५७ महिलांचा समावेश होता. यावेळी त्यांना एक टास्क देण्यात आले होते. सहभागी लोकांना त्यानंतर दोन गटात विभागण्यात आले. एका गटाला हवे तेवढे अल्कोहोल पिण्याची मुभा देण्यात आली तर दुस-या गटाला अल्कोहोल पिण्यास मनाई करण्यात आली. दुस-या सर्वच लोकांनी तोच टाक्स पुन्हा केला. यातून निष्कर्ष निघाला की, ज्यांनी अल्कोहोल घेतले होते त्यांना गोष्टी जास्त लक्षात होत्या.

याबाबत माहिती देताना यूनिव्हर्सिटी ऑफ एक्सिटरच्या प्रोफेसर स्लिया मॉर्गन यांनी सांगितले की, या आमच्या अभ्यासातून असे समोर आले आहे की ज्यांनी अल्कोहोल सेवन केले होते त्यांनी वर्ड लर्निंगचा टास्क चांगला केला आणि ज्यांनी जास्त अल्कोहोल सेवन केले होते त्यांनी ते अधिक चांगले केला. पण अद्याप याचे कारण स्पष्ट नाही पण असे मानले जात आहे की, अल्कोहोल कोणत्याही नव्या लर्निंगला ब्लॉक करते. त्यामुळे ब्रेनमध्ये जास्त संसाधन होते. जे नव्याने लक्षात ठेवलेल्या सूचनेला जास्त काळ लक्षात ठेवण्यात मदत करते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment