जगातील पहिलेच प्रकरण, मच्छर नाही तर शारिरीक संबंध ठेवल्यामुळे झाला डेंग्यू

मेडिकल सायन्सनुसार, डेंग्यू केवळ मच्छर चावल्यानेच होतो. मात्र स्पेनमध्ये असे एक प्रकरण समोर आले आहे ज्यात एका रुग्णाला मच्छर चावल्यामुळे नाही तर शारिरीक संबंध ठेवल्याने डेंग्यू झाला आहे.

स्पेनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर दावा केला आहे की, शारिरिक संबंधांमुळेच या व्यक्तीला डेंग्यू झाला आहे. जगातील हा पहिलाच असा रुग्ण आहे ज्याला मच्छरामुळे नाही तर शारिरिक संबंधांमुळे डेंग्यू झाला आहे.

मद्रिदमध्ये राहणाऱ्या 41 वर्षीय व्यक्तीचे देखील म्हणणे आहे की, समलैंगिक संबंधामुळे डेंग्यू झाला आहे. मद्रिद जिल्हा पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटचे प्रमुख सुजाना जीमेंज यांचे म्हणणे आहे की, मेल पार्टनरला क्यूबा ट्रिप दरम्यान डेंग्यू झाला होता. आधीपासूनच डेंग्यू झालेल्या व्यक्तीशी शारिरिक संबंध ठेवल्याने त्याला देखील डेंग्यू झाला. या दोन्ही व्यक्तींमध्ये एक सारखे लक्षण दिसले आहेत.

दोन्ही व्यक्तींच्या वीर्याची तपासणी केल्यानंतर आढळले की, दोघांच्या शरीरात एक सारखाच व्हायरस आहे, जो क्यूबामध्ये डेंग्यूचे कारण ठरला होता.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment