फक्त 299 रुपयात दिल्लीच्या या बारमध्ये मिळत आहे ‘शुद्ध हवा’

संपुर्ण जग हे आज एक बाजार झालेले आहे. प्रत्येक जण काहींना काही विकून नफा मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. वेळेप्रमाणे आता लोकांच्या गरजा बघून वस्तूंची विक्री केली जात आहे. आधी बाटलीबंद पाणी आपल्याला मिळत असे. आता ताजी हवा देखील बाजारात विक्रीसाठी आली आहे.

सध्या दिल्लीतील वायू प्रदुषणाच्या स्तराने उच्चांक पातळी घाटली आहे. अशा परिस्थितीत दिल्लीतील साकेत भागातील Oxy Pure नावाचा एक बार शुद्ध ऑक्सिजनच्या नावाखाली 299 रुपये वसूल करतो. येथे तुम्हाला 299 रुपयात 15 मिनिटे वेगवेगळ्या फ्लेवर्सची शुद्ध हवा देण्यात येते.

हा हटके बार याचवर्षी मे मध्ये सुरू झाला आहे. येथे 7 फ्लेवर्समध्ये ऑक्सिजन मिळतो. यात Lemon Grass, Orange, Cinnamon, Spearmint, Peppermint, Eucalyptus आणि  Lavender फ्लेवर्सचा समावेश आहे.

येथे ग्राहक एका ट्यूबद्वारे शुद्ध हवा घेऊ शकतो. सांगण्यात येत आहे की, हा ऑक्सिजन दिवसातून एकदाच व काही वेळासाठीच घेतला जातो.

बारचे हेड स्टाफ बोनी इरेनबॅम यांनी सांगितले की, शुद्ध ऑक्सिजन केवळ शरीराला उर्जाच नाही तर मेंदूला देखील फ्रेश करते. याशिवाय या ऑक्सिजनमुळे स्कीन देखील ग्लो होते.

Leave a Comment