दीपिकाने शेअर केले लहान बाळाचे फोटो, रणवीरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया


अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. चाहत्यांमध्ये २०१८ साली लग्न केलेल्या या जोडीची कायमच चर्चा रंगत असते. त्यामुळे कोणतीही माहिती त्यांच्याविषयी समोर आली की ती झटक्यात व्हायरल होते. त्यातच दीपिकाने इन्स्टाग्रामवर काही दिवसापूर्वी लहान बाळाचे फोटो शेअर केल्यामुळे दीपिका आई होणार का? असा प्रश्न चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे. त्यातच रणवीरने जी कमेंट या फोटोवर केली, ती पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये सध्यातरी संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

View this post on Instagram

post diwali celebrations…💤 #diwali

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on


अलिकडेच इन्स्टाग्रामवर एका लहान मुलाचे फोटो दीपिकाने शेअर केले होते. दीपिकाने या फोटोला दिवाळीनंतरचे सेलिब्रेशन असं कॅप्शनही दिल्यामुळे दीपिका गरोदर आहे का? अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. त्यातच रणवीरनेही हा फोटो पाहिल्यानंतर त्यावर भन्नाट कमेंट केली. एक हार्टशेपची इमोजी शेअर करत त्याने कमेंट केली आहे. त्याची ही कमेंट पाहिल्यानंतर चाहत्यांना खरोखरच प्रश्न पडला आहे. दीपिका गरोदर आहे का? असा प्रश्न काही चाहत्यांनी विचारला आहे. तर काहींनी तुम्ही बेबी प्लानिंग करत आहात का? असा प्रश्न काहींनी विचारला आहे.

Leave a Comment