‘दबंग ३’मधील राहत फतेह अली खानच्या दोन गाण्यांना कात्री


सुप्रसिद्ध पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांनी पूर्वीच ‘दबंग ३’ साठी दोन गाणी गायली होती. पण ‘दबंग ३’ च्या टीमने या गाण्यांचा चित्रपटात समावेश न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोब राहत फतेह अली खान यांचा प्रवक्ता सलमान अहमद यांनी राहत फतेह अली खान यांची गाणी वगळली असली तरी सलमान आणि त्यांच्यामध्ये कोणतीही कटुता नसल्याचे केले आहे.

यापूर्वी दबंगसाठी राहत यांनी ‘तेरे मस्त मस्त दो नैन’ आणि ‘नैना बडे दगाबाज’ ही दोन गाणी गायली होती. राहत यांच्या आवाजातील ती दोन्ही गाणी खूपच लोकप्रिय ठरली होती. राहत यांनी ‘दबंग ३ साठी दोन गाणी रेकॉर्ड केली होती. पण सलमानने सध्याची परिस्थिती पाहता ही गाणी वगळण्याचा निर्णय घेतला. सध्या दोन्ही देशांतील संबंध हे तणावपूर्ण आहेत. सलमानला वाद नको असल्यामुळे त्याने देशवासींयाचा विचार केला, असल्याचे राहत यांचे प्रवक्ते सलमान अहमद बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

Leave a Comment