अमेरिकेच्या समुद्रात फेकलेल्या बाटलीबंद चिठ्ठीला 9 वर्षांनी फ्रांसवरून आले उत्तर

ऑगस्ट 2010 मध्ये मॅक्स वेडेनबर्ग नावाच्या एका लहान मुलाने बंद बाटलीत एक चिठ्ठी लिहून बाटली अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स येथील समुद्रात टाकली होती. त्यावेळी मॅक्सचे वय 10 वर्ष होते. मात्र मॅक्सला कधीही वाटले नसेल की, आपल्या या चिठ्ठीला कधीतरी उत्तर येईल. मात्र अखेर 9 वर्षांनी मॅक्सला त्याच्या चिठ्ठीसाठी उत्तर मिळाले.

मॅक्सने चिठ्ठी बाटलीच्या आत बंद करून समुद्रात फेकली होती. 9 वर्षात ही बाटली अमेरिकेवरून फ्रांसला पोहचली. फ्रांसच्या रॉकपोर्टमध्ये ही बाटली जी. डूबोईसला सापडली. त्यांनी मॅक्सची चिठ्ठी वाचली आणि त्याला उत्तर देखील दिले. मॅक्सने स्वतःची 9 वर्ष जुनी चिठ्ठी आणि डूबोईस यांनी दिलेले उत्तर स्वतः शेअर केले.

मॅक्सने त्याला उत्तर पाठवणाऱ्या जी. डूबोईस यांना सोशल मीडियावर शोधले देखील. अखेर त्याला इंस्टाग्रामवर जी. डूबोईस सापडले. सोशल मीडियावर या हटके गोष्टीने लोकांचे मन जिंकले आहे.

9 वर्षांपुर्वी मॅक्सने आपल्या चिट्टीत लिहिले होते की, हॅलो, माझे नाव मॅक्स आहे. जे कोणी ही चिठ्ठी वाचत असेल त्यांनी नक्की याचे उत्तर द्या. मी तुम्हाला स्वतः बद्दल सांगतो. मी 10 वर्षांचा आहे. मला सफरचंद खायला आवडतो. मला समुद्राचा किनारा आवडतो. माझा आवडता रंग निळा आहे. मला कार आवडते. मला अंतराळ खूप भारी वाटते. प्लीज, मला रिप्लाय करा.

मॅक्सच्या चिठ्ठीला उत्तर देताना डूबोईस यांनी लिहिले की, त्यांना 10 ऑक्टोंबर 2019 ला बाटलीबंद मेसेज मिळाला. 9 वर्षात या बाटलीने 6 हजार किमीचा प्रवास केला आहे. आपल्या उत्तरात डूबाईस यांनी एक मॅप देखील बनवला जो बाटलीचा प्रवास दर्शवतो.

Leave a Comment