आधार कार्डमधील या चुकीसाठी भरावा लागेल 10 हजारांचा दंड


नवी दिल्ली – करदात्यांच्या सोयीसाठी आयकर विभागाने पॅन क्रमांकाऐवजी 12-अंकी आधार क्रमांक वापरण्याची परवानगी दिली आहे, परंतु हे करताना तुम्हाला खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे कारण जर तुम्ही चुकीचा आधार क्रमांक दिला तर तुम्हाला 10,000 रुपये दंड भरावा लागू शकतो.

वित्त विधेयक 2019 मध्ये सादर करण्यात आलेल्या प्राप्तिकर अधिनियम 1961 मध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या सुधारणेत पॅनच्या जागी आधार क्रमांक वापरण्याची परवानगीच नाही तर चुकीचा आधार क्रमांक देण्यासाठी दहा हजार रुपये दंडाची तरतूदही करण्यात आली आहे.

दंडाचा हा नवीन नियम फक्त तेथे लागू होतो जेथे आपण पॅनच्या जागी आधार क्रमांक वापरत असाल आणि आयकर विभागाच्या नियमानुसार पॅन क्रमांक देणे अनिवार्य आहे. उदाहरणार्थ, आयकर विवरणपत्र भरणे, बँक खाते उघडणे, डिमॅट खाते उघडणे आणि म्युच्युअल फंड व 50 हजारांपेक्षा जास्त किमतीचे रोखे खरेदी करणे.

आधार कार्डसाठीचे नवे नियम

  • आधार युनिक आयडेंटिटी अथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) जारी केला जात असला तरी दंड युआयडीएआयकडून नव्हे तर प्राप्तिकर विभागाकडून आकारला जातो.
  • प्राप्तिकर अधिनियम, 1961च्या कलम 272 बी नुसार, आयकर दाता पॅनच्या तरतुदींचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास आयकर विभाग दंड आकारू शकतो. दंड रक्कम प्रत्येक डिफॉल्टसाठी 10,000 रुपये असेल.
  • पूर्वी, दंड फक्त पॅनपुरता मर्यादित होता, परंतु सप्टेंबरमध्ये जेव्हा पॅन-आधार अदलाबदल करण्याची तरतूद करण्यात आली तेव्हा ते आधारवरदेखील लागू झाले.

कोणत्या परिस्थितीत केला जाईल दंड

  1. पॅनऐवजी चुकीचा आधार क्रमांक दिला तर.
  2. एखाद्या विशिष्ट व्यवहारामध्ये आपण पॅन किंवा आधार क्रमांक प्रदान करण्यात अयशस्वी ठरल्यास.
  3. आधार क्रमांक प्रदान करणे पुरेसे नाही, तर तुम्हाला बायोमेट्रिक ओळख देखील प्रमाणित करावी लागेल आणि ती अपयशी ठरल्यास तुमच्याकडून दंड आकारला जाईल.
  4. पॅन किंवा आधार क्रमांक योग्यरित्या न दिल्यास आणि त्यास प्रमाणीकृत केले नाही तर नियमांनुसार बँका, वित्तीय संस्था इत्यादींनाही दंड होऊ शकतो.
  5.  या व्यतिरिक्त हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की जर आपण चुकीच्या पद्धतीने दोन फॉर्ममध्ये आधार क्रमांक दिला तर तुम्हाला प्रत्येकी 10-10 हजार रुपये म्हणजे 20 हजार रुपये दंड भरावा लागू शकतो. म्हणून, फॉर्म भरताना सावधगिरी बाळगणे कधीही चांगले ठरेल.

Leave a Comment