अल्पवधीतच प्रसिद्ध झाला जगातील सर्वात कुरूप कुत्रा


नवी दिल्ली – जगभरात एका पेक्षा एक अशा सुंदर कुत्र्यांच्या जाती आहेत. सोशल मीडियावर दररोज सुंदर कुत्र्यांचे फोटो देखील पाहायला मिळतात, पण सध्या सोशल मीडियावर जगातील सर्वात आळशी आणि कुरूप कुत्र्याचा फोटो व्हायरल होत आहे. पण हा फोटो व्हायरल होणे मागे देखील विशेष कारण आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये दरवर्षी कुरूप कुत्र्यांसाठी एका स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावेळी हा किताब ३ वर्षाच्या नेपोलियन मास्टिफ मार्थाने जिंकला. या बातमीपूर्वी जगभरातील अनेक कुरूप कुत्र्यांप्रमाणे मार्था देखील पहाणे कोणाला पसंत नव्हते, पण आता त्याने हा किताब जिंकल्यानंतर तो सगळ्यांचा लाडका बनला आहे. मार्थाला बक्षीस म्हणून १ लाख रुपये आणि एका क्राऊन देण्यात आला.

Leave a Comment