राममंदिरासाठी २.७७ एकर, मग तेवढीच जागा मशिदीसाठी द्यायला हवी होती


नवी दिल्ली – शनिवारी सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर ऐतिहासिक निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात यावे तर मशीद बांधण्यासाठी वेगळी ५ एकर जमीन देण्यात यावी, असा निकाल दिला. सर्वत्र सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचे स्वागत करण्यात आले. पण या निर्णयासंबंधात वादग्रस्त बंगाली लेखिका तस्लिमा नसरीन यांनी एक सवाल केला आहे.


आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे प्रसिद्ध बंगाली लेखिका तस्लिमा नसरीन या बऱ्याचदा चर्चेत असतात. त्या सध्या अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेल्या निकालावरील ट्विटमुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राम मंदिर अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जागेवर बांधण्यात यावे तर मशीद बांधण्यासाठी इतरत्र ५ एकर जागा द्यावी, असे निर्देश देण्यात आले. त्याबाबत बोलताना हिंदूंना मंदिरासाठी २.७७ एकर जमीन देण्यात आली आहे. तर मशीदीसाठी मुस्लिमांनाही २.७७ एकर जागा दिली जायला हवी होती. मग त्यांना ५ एकर जमीन का देण्यात आली?, असा सवाल ट्विटच्या माध्यमातून त्यांनी केला.

Leave a Comment