जगातील एकमेव हा चित्रकार शिलाई मशिनद्वारे बनवतो पेटिंग्स

तुम्ही अनेक चित्रकारांचा पेटिंग पाहिल्या असतील. सुंदर असण्याबरोबरच त्या वेगळ्या देखील असतात. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा चित्रकाराबद्दल सांगणार आहोत, जो इतरांपेक्षा सर्वाधिक वेगळा आहे. या चित्रकाराला जगातील एकमेव ‘निडल मॅन’ म्हटले जाते. ते शिलाई मशीनद्वारे सुंदर पेटिंग्स बनवतात.

(Source)

या चित्रकाराचे नाव अरूण बजाज असून, ते पंजाबच्या पटियाला येथील आहे. 35 वर्षीय अरूण यांनी गुरू नानक देव यांच्या 550 व्या प्रकाश पर्वच्या निमित्ताने शिलाई मशीनद्वारे खास पेटिंग तयार केली आहे. ते जगातील एकमेव असे कलाकार आहेत, जे शिलाई मशीनद्वारे पेटिंग बनवतात.

(Source)

अरूण यांनी शिलाई मशीनद्वारे आतापर्यंत अनेक प्रसिध्द व्यक्तींच्या पेंटिग्स तयार केल्या आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देखील समावेश आहे. त्यांनी 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना मशीनद्वारे बनवलेली पेटिंग भेट दिली होती.

अरूण यांनी आपल्या कलेद्वारे विश्व विक्रम देखील बनवला आहे. त्यांचे नाव इंडिया बूक ऑफ रेकॉर्डपासून ते लिम्का वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नमूद आहे.

(Source)

अरूण यांनी श्रीकृष्णाची एक सुंदर पेटिंग तयार केली होती, त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते. हा फोटो बनवण्यासाठी त्यांना तीन वर्षाचा कालावधी आणि 28 लाख 36 हजार मीटर धागा लागला होता. ही जगातील पहिली अशी पेटिंग होती, जिला शिलाई मशीनद्वारे बनवण्यात आले होते.

(Source)

अरूण 12 वर्षांचे होते, तेव्हापासूनच शिलाईचे काम करत आहेत. 23 वर्षांपासून ते हे काम करत आहेत. अरूण 16 वर्षांचेच असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हापासून ते आपल्या वडिलांचे दुकान सांभाळत आहेत. यामुळे त्यांना शिक्षण देखील सोडून द्यावे लागले होते.

(Source)

अरूण यांना प्रसिध्द चित्रकार बनायचे होते, मात्र वडिलांच्या निधनानंतर जबाबदारीमुळे त्यांचे हे स्वप्न अपुर्णच राहिले होते. मात्र तरीही त्यांनी आपल्या कलेद्वारे जगभरात नाव कमवले आहे.

Leave a Comment