कॉफीत मिसळा चार थेंब खोबरेल तेल


वजन कमी करणे हे वजन कमी करण्याचे फॅड इतके वाढत चालले आहे की त्यासाठी लोक वाट्टेल ते नवनवे शोध लावत आहेत. आता काही लोकांनी केटो डायट या नावाने नवे पेय शोधून काढले आहे. त्यात कॉफी आणि खोबरेल तेल याचे मिश्रण केले जाते. हे मिश्रण चवीला फार चांगले लागत नसले तरी ते अनेक प्रकारे गुणकारी आहे असा दावा काही लोक करायला लागले आहेत. कोणाला आवडो की न आवडो परंतु एरवी विषारी म्हटले जाणारे कॉफीमधले कॅफेन हे द्रव्य खोबरेल तेलाच्या संयोगाने औषधी गुण धारण करायला लागले आहे. कॉफी प्यायल्याने थोडी उत्तेजना मिळते आणि सकाळी एक कप कॉफी पिल्यास ताजेतवाने वाटते. हा तर आपला रोजचाच अनुभव परंतु आता हा खोबरेल तेलाचा जो नवा पर्याय निर्माण झाला आहे तो विलक्षण आहे.

त्यासाठी एक कप कॉफी तयार करून घ्या आणि त्यात खोबरेल तेलाचा एखादा छोटा चमचा टाका. हे मिश्रण तयार करणे तसे फारसे अवघड नाही. परंतु सुरूवातीला ते पिणे फार अवघड आहे. थोडी कल्पना करून बघा ना. गरमागरम कॉफीचा विलक्षण स्वाद सोडून द्यायचा आणि त्यामध्ये चक्क खोबरेल ते मिसळायचे याची चव कशी लागत असेल. हा शोध ज्या लोकांनी लावला आहे त्यांनाही ही गोष्ट मान्य आहे की सुरूवातीला ही चव वाईटच लागते. परंतु एकदा सवय झाल्यानंतर त्या चवीचे काही वाटत नाही. तर असा हा कॉफीचा कप दररोज सकाळी पोटात रिचवावा त्यामुळे अधिक ताजेतवाने वाटतेच परंतु वजन कमी होण्याससुध्दा मदत होते. या कॉफीला हे मिश्रण शोधून काढणार्‍यांनी बुलेट कॉफी असे नाव दिले आहे.

ही कॉफी प्यायल्यानंतर लवकर भूक लागत नाही आणि एका ब्रेकफास्टला पर्याय म्हणून ती काम करते. मात्र या विचित्र मिश्रणाचा वजन कमी होण्यावर कसा परिणाम होतो याचा काही उलगडा झालेला नाही. मात्र या पेयाच्या प्रणेत्यांच्या मते वजन कमी होते. कारण आपण जेव्हा पोटात कर्बोदकांच्या ऐवजी एखादा स्निग्ध पदार्थ घेतो तेव्हा स्निग्ध पदार्थ चरबीच्या ज्वलनास कारणीभूत ठरतो आणि वजन कमी होते. हे विचित्र मिश्रण शोधून काढणार्‍यांचा दावा काहीही असला तरी सर्वांनी हा प्रयोग करणे हितकारक ठरेलच असे नाही. काही लोकांना या मिश्रणाच्या वासाची किळस येते आणि काही लोकांना तर हागवणही लागू शकते. तेव्हा हे मिश्रण पिण्याचा कोणी कितीही आग्रह केला तरी त्याचा वापर लोकांनी आपल्या आरोग्याचा विचार करूनच करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment