73 वर्षीय या आजीबाईंनी पटकावला ‘बिकनी बॉडी चॅम्पियनशीप’ खिताब

जर तुम्हाला एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी वय कधीच अडचण ठरत नाही, असे म्हटले जाते. याचे जिंवत उदाहरण अमेरिकेतील नेवाडा येथील मारिया ख्रिस्टिना या आहेत. 73 व्या वर्षी मारिया यांनी बिकनी बॉडी चॅम्पियन किताब पटकवला आहे.

चार वर्षांपुर्वी म्हणजेच वयाच्या 69 व्या वर्षी मारिया यांनी फिटनेसवर लक्ष देण्यास सुरूवात केली व यासाठी त्यांनी पर्सनल ट्रेनर देखील ठेवला. मारिया सांगतात तरूण असताना त्या एक्टिव होत्या. मात्र जसजसे वय होत गेले, तसे त्यांचे वजन वाढत गेले व त्यांचे काम देखील हळू झाले.

निवृत्तीनंतर अखेर फिटनेससाठी त्यांनी पर्सनल ट्रेनरची नेमणूक केली. हाच त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण होता. त्यांनी आठवड्यातून तीन वेळा व्यायाम करण्यास सुरूवात केली. रोज सकाळी कार्डिओ करण्यास सुरूवात केली.

दोन वर्षांपुर्वी, 2017 मध्ये त्यांच्या पेक्षा वयाने अर्ध्या असलेल्या स्पर्धकांबरोबर त्यांनी फिटनेस मॉडेलिंग कॉन्टेस्टमध्ये भाग घेतला. पहिल्याच स्पर्धेत त्यांनी 6 किताब पटकावले.

मारिया म्हणाले की, मी बघते की, पुरूष 80 व्या वर्षी देखील स्पर्धेत भाग घेतात. मात्र महिला 50 वर्षांच्या झाल्यानंतर भाग घेणे सोडून देतात. मला आशा आहे की, माझ्या सारख्या 73 वर्षीय महिलेला असे भाग घेताना बघून त्यांनाही हे शक्य आहे असे वाटेल.

Leave a Comment