…यामुळे जपानमधील महिलांवर ऑफिसामध्ये चष्म्यावर बंदी

सर्वसाधारणपणे ऑफिसमध्ये कॉम्प्युटरवर अधिक वेळ काम करणारे कर्मचारी चष्मा घालतातच. चष्मा नको असला तरी, डोळ्यांना होणाऱ्या त्रासामुळे त्यांना चष्मा घालावाच लागतो. मात्र जगामध्ये असा एक देश आहे जेथे, कंपनीमध्ये महिलांना चष्मा घालण्यास बंदी आहे. याच्या मागील कारण देखील विचित्र आहे.

जापानमध्ये ऑफिसमधील महिला कर्मचाऱ्यांना चष्मा घालण्यास मनाई आहे. तर पुरूष कर्मचाऱ्यांना यात सुट देण्यात आली आहे. येथील एअरलाईन्सपासून ते हॉटेलपर्यंत अनेक क्षेत्रात महिला चष्मा लावून काम करू शकत नाही.

एवढेच नाही तर जापानच्या एका कंपनीने महिला कर्मचाऱ्यांना मेकअप करूनच ऑफिसमध्ये येण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय कंपनीने महिलांना वजन कमी करण्याचे निर्देश दिले आहेत.

कंपन्यांचे म्हणणे आहे की, कामाच्या ठिकाणी महिला चष्मा परिधान करून आल्यावर त्यांच्या सुंदरतेवर परिणाम होतो व ज्यामुळे क्लाइंट्सवर चुकीचा प्रभाव पडतो. यामुळे कंपनीच्या व्यवहारांवर देखील प्रभाव पडतो.

कंपनीच्या या विचित्र नियमांचा महिला विरोध करत आहेत. ट्विटरवर महिला #glassesareforbidden वापरून चष्मा घालून फोटो शेअर करत आहेत. याआधी देखील जापानमध्ये महिलांना हाय हिल सँडल घालून कंपनीमध्ये येणे अनिवार्य केले होते. महिलांनी याचा विरोध केल्यानंतर या विचित्र नियमांवर बंदी घालण्यात आली.

Leave a Comment