बाबरने बांधली मशिद, तर त्याच्या नातवाने तयार केली प्रभू रामांची नाणी

मुघलवंशाचe पाया ठेवणाऱ्या बाबरचा नातू  शहेशाह अकबरने आग्रा किल्यामधून 415 वर्षांपुर्वी प्रभू राम-सीता यांच्यावर चांदीचे नाणे जारी केले होते. 1604 मध्ये आग्रा टाकसाळमधून हे चांदीचे नाणे तयार करण्यात आले होते. चांदीच्या या नाण्यावर फारशीमध्ये लिहिलेले होते.

(Source)

मुघल सम्राट अकबरने फतेहपुर सिकरीमध्ये 1584 ला दीन ए इलाही धर्माची सुरूवात केली होती. सिकरीमध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे पुन्हा एकदा राजधानी आग्र्याला हलवण्यात आली.

(Source)

आग्रा किल्यावरून संपुर्ण देशावर शासन करत असलेल्या अकबरने 1604 मध्ये प्रभू रामांच्या प्रती आस्था दाखवत सोने व चांदीची नाणी तयार केली होती. या नाण्यांवर राम-सिया असे नमूद केलेले होते.

(Source)

आपल्या शासनाच्या काळात अकबरने हिंदू धर्माचे प्रतिक असलेले अशी अनेक नाणी तयार केली. यामध्ये राम-सिता यांच्यासोबत स्वास्तिक, त्रिशूल, गोविंद यांची नाणी मुख्य होती. चार ग्रॅम वजन असलेले हे शिक्के आग्रा आणि सिकरीच्या टाकसाळात तयार करण्यात येत.

 

Leave a Comment