अलीबाबाने 9 तासात विकले तब्बल 1615 अब्ज रूपयांचे सामान

चीनची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अलीबाबाने सिंग्लस डे सेलमध्ये पहिल्या 9 तासातच 22.63 अब्ज डॉलर्स (1615.14 अब्ज रुपये) किंमतीच्या सामानाची विक्री केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 25 टक्के अधिक विक्री झाली आहे. अलीबाबा दरवर्षी 11 नोव्हेंबरला सिंग्लस डेचे आयोजन करते. 11/11 तारीख असल्याने या दिवसाला डबल 11 देखील म्हटले जाते.

अलीबाबाचे चेअरमन आणि सीईओ डॅनियल झांगने 2009 ला चीनमध्ये सिंग्लस डेची सुरूवात केली होती. मागील 10 वर्षात हे आयोजन जगातील सर्वात मोठे शॉपिंग इव्हेंट झाले आहे. मागील 24 तासात 40 कोटी युजर्सने सामान ऑर्डर केले आहे.

मागील वर्षी अलीबाबाने सिंग्लस डे च्या दिवशी 30 अब्ज डॉलरची विक्री केली होती. अमेरिकेत आयोजित करण्यात येणाऱ्या सायबर मंडे शॉपिंगच्या तुलनेत 7.9 अब्ज डॉलरची विक्री अधिक आहे.

जॅक मा यांनी अलीबाबाच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिल्यानंतर हा पहिलाच सिंग्लस डे इव्हेंट आहे. यावर्षी या इव्हेंटची सुरूवात अमेरिकन पॉप स्टार टेलर स्विफ्ट आणि जॅक्शन यी यांच्या कार्यक्रमांद्वारे झाली.

Leave a Comment