पृथ्वी आणि चंद्राच्या मध्यभागी 2050 पर्यंत चीन तयार करणार इकोनॉमिक झोन

चीनच्या आर्थिक महत्त्वकांक्षेसमोर आता पृथ्वी देखील छोटी पडू लागली आहे. आता चीन अंतराळात इकोनॉमिक झोन तयार करण्याचा विचार करत आहे. हा झोन चंद्र आणि पृथ्वीच्या मध्यभागी असेल. चीन या प्रोजेक्टवर जवळपास 706 लाख कोटी रूपये खर्च करणार आहे.

चीनच्या एअरोस्पेस सायन्स अँन्ड टेक्नोलॉजी कार्पोरेशनचे प्रमुख बाओ वीमन यांनी सांगितले की, चंद्र आणि पृथ्वीच्या मधील क्षेत्रात मोठी आर्थिक क्षमता आहे. चीनला पृथ्वी आणि त्याच्या उपग्रहामधील कमी खर्चिक आणि विश्वासार्ह्य एअरोस्पेस ट्रांसपोर्ट सिस्टम विकसित करेल.

या प्रोजेक्टच्या बेसिक टेक्नोलॉजीवर 2030 पर्यंत काम पुर्ण होईल. तर प्रमुख ट्रांसपोर्ट टेक्नोलॉजी 2040 पर्यंत पुर्ण होईल. अधिकाऱ्यांनुसार, 2050 पर्यंत चीन यशस्वीरित्या अंतराळात इकोनॉमिक झोनची स्थापना करेल.

जुलै महिन्यात चीनची खाजगी कंपनी आय-स्पेसने ऑर्बिटल मिशनसाठी पहिले कॅरियर रॉकेटचे यशस्वी परिक्षण केले होते.

मागील वर्षी चीनने चंद्र मिशन चांग ए 4 लाँच केले होते. जे 3 जानेवारीला चंद्रावर यशस्वीरित्या लँड झाले. चीनचे सर्वात मोठे लाँच व्हिकल लाँग मार्च-5 च्या साहय्यतेने 2020 ला चांग-5 चंद्रावरून नमुने आणण्यासाठी पाठवले जाईल.

Leave a Comment