या टिप्सद्वारे तुमच्या गाडीला बनवा एसयूव्ही, वाढेल गाडीचे ग्राउंड क्लियरेंस

अनेकदा सेडान आणि हॅचबॅक कारमध्ये कमी ग्राउंड क्लेरेंसची समस्या येत असते. तर कारमध्ये घरातील 5 लोक बसलेले असतील तर मोठ्या स्पीडब्रेकरमुळे अनेकदा चेसिस रस्त्याला घासते. जर तुम्ही देखील तुमच्या कारमधील कमी ग्राउंड क्लिरेंसला वैतागला असाल, तर तुम्ही देखील काही पद्धती वापरून तुमच्या कारला एसयूव्ही बनवू शकता. यासाठी जास्त खर्च देखील येत नाही.

(Source)

सध्या येणाऱ्या कारमध्ये कॉयल स्प्रिंग संस्पेंशन असते. तुम्ही असिस्टर्सच्या मदतीने कॉयल स्प्रिंग सस्पेशनची उंची वाढवू शकता. पॉलियुरेथेनपासून बनलेले हे पार्ट स्प्रिंग सस्पेशन कॉयल्सच्या मध्यभागी लावलेले असतात. ते असिस्टर्स सस्पेशनला हार्ड बनवते आणि त्याची हलचाल मर्यादित ठेवते. याला लावल्याने गाडीची उंची 10 एमएमवरून 15 एमएम वाढते.

ज्या कार कॉयल सस्पेंशन सेटअप सोबत येतात. त्यामध्ये असिस्टर्स लावले जाऊ शकतात. कोणीही मॅकेनिक हे सहज लावू शकते. याची किंमत 5 हजारापर्यंत आहे व हे 50 हजार किमी चालते. कार कंपनीला याची माहिती मिळाल्यास तुमची वाँरंटी संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे गाडीची सर्विसिंग करण्याआधी असिस्टर्स काढावा.

(Source)

काही लोक गाडीची उंची वाढवण्यासाठी मोठे टायर आणि रिम लावतात. असे असले तरी हे खर्चिक काम आहे. मोठे टायर व रिम लावल्याने सस्पेंशन खराब होऊ शकते. तर अनेकदा वाहन वळवताना देखील अडचण येते.

जसे की, 185/60 R14 ते 185/70 R14 टायर साइज केल्यावर 10 एमएम अतिरिक्त ग्राउंड क्लियरेंस मिळते. तर 10 से 15 इंच रिम साइज वाढवल्यावर खूप ग्राउंड क्लियरेंस मिळते. हे खर्चिक काम आहे.

(Source)

अनेकदा कारला रेसिंग अथवा रॅली कारमध्ये बदलण्यासाठी लोक सस्पेंशन बदलतात. जेणेकरून खडतर रस्त्यावर देखील गाडी स्थिर राहील. यामुळे मोठ्या स्पीड ब्रेकरवर देखील गाडीचे संतुलन बिगडत नाही व गाडी जंप करत नाही. अनेक कंपन्या हे स्टिफर सस्पेंशन बनवत आहे.

स्टिफर सस्पेंशनची किंमत जवळपास 50 हजारापर्यंत आहे. कोणत्याही गॅरेजमधून तुम्ही सस्पेंशन अपग्रेड करू शकता. आपल्या गाडीच्या स्पेसिफिकेशनप्रमाणेच सस्पेंशन निवडा.

Leave a Comment