व्हॉट्सअ‍ॅपची आक्षेपार्ह नाव असलेल्या ग्रुपमधील प्रत्येक सदस्यावर बंदी


दिवसागणिक ज्याप्रमाणे व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे, त्याचबरोबर याचा गैरवापर करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमिवर व्हॉट्सअ‍ॅपकडून सातत्याने गैरवापराला आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संशयास्पद नावे असणारे व्हॉटसअ‍ॅप ग्रुप्स ब्लॉक करण्यास आता व्हॉटसअ‍ॅपने प्रारंभ केला आहे. व्हॉट्सअ‍ॅपकडून त्या आक्षेपार्ह नाव असलेल्या ग्रुपमधील प्रत्येक सदस्यावर बंदी घातली जात आहे. सोशल मीडियात याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली असून याबाबत अद्याप व्हॉट्सअ‍ॅपने अधिकृत घोषणा केलेली नाही.

या संदर्भातील वृत्त ‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, Mowe11 या रेड्डिट (Reddit) एका युजरने व्हॉट्सअ‍ॅप बॅनची पहिली घटना निदर्शनास आणली. विद्यापीठाच्या ग्रुपचे नाव बदलून ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’ असे केल्यानंतर मला बॅन करण्यात आल्याचे या युजरने म्हटले आहे. कोणतीही कल्पना ग्रुपमधील प्रत्येक सदस्याला न देता बॅन करण्यात आले. व्हॉट्सअॅपशी याबाबत संपर्क साधला असता, ही कारवाई कंपनीकडून तुम्ही नियमांचं उल्लंघन केल्यामुळे केल्याचे सांगण्यात आले, असे या युजरने म्हटले आहे. एका आठवड्यानंतर बंदी घातलेल्या त्या सदस्यांचे व्हॉट्सअॅप अकाऊंट चालू केले. तसेच अशीच तक्रार अन्य काही व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांनीही केली आहे. ‘डिसग्सटींग’ असे एका ५० सदस्य असलेल्या ग्रुपचे नाव बदलण्यात आल्यानंतर त्यांचा ग्रुपही बंद करण्यात आला. दुपारी त्या ग्रुपने नाव बदलले आणि रात्री ग्रुपमधील सर्व सदस्यांवर व्हॉट्सअ‍ॅपने बंदी घातली. त्या सर्व सदस्यांचे २७ दिवसांनंतर व्हॉट्स अ‍ॅप चालू करण्यात आले.

याबाबत व्हाटसअ‍ॅपने अधिकृत घोषणा केली नसली तरी मेसेंजरवरून हेट स्पीच, फेक न्यूज आदींचा प्रचार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे म्हटले जाते. त्याचबरोबर आक्षेपार्ह नाव असल्यास तो ग्रुप आपोआप बंद करण्याची प्रक्रिया नव्या अपडेटमध्ये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment