बॉक्स ऑफिसवर आयुष्मानच्या ‘बाला’चा धुमाकुळ


वादात सापडलेल्या अभिनेता आयुष्मान खुरानाच्या ‘बाला’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत बक्कळ कमाई केली आहे. पहिल्याच तीन दिवसातच चित्रपटाने ४० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. या चित्रपटात अकाली टक्कल पडणाऱ्या एका तरुणाची कथा दाखवण्यात आली आहे.

समीक्षकांकडून कौतुक झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचाही भरभरून प्रतिसाद लाभला आहे. ‘बाला’च्या कमाईचे आकडे चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहेत. ‘बाला’ने पहिल्या आठवड्यात ४३.९५ कोटींची कमाई केली आहे. शुक्रवारी या चित्रपटाने १०.१५ कोटी, शनिवारी १५.७३ कोटी आणि रविवारी १८.०७ कोटींचा गल्ला चित्रपटाने जमावला आहे.

या चित्रपटात आयुष्मानसोबत भूमी पेडणेकर आणि यामी गौतमची प्रमुख भूमिका आहे. आयुष्मानचा ‘बाला’ हा २०१९ या वर्षांतील तिसरा सुपरहिट चित्रपट ठरला आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘आर्टिकल १५’ नं २०.४ कोटींची कमाई केली होती. तर ‘ड्रिम गर्ल’नं ४४.५७ कोटींचा गल्ला जमवला होता.

Leave a Comment