ऑस्ट्रेलियात अशाप्रकारे जेवण बनविल्यास 4 लाखांचा दंड आणि 12 वर्षांची शिक्षा

ऑस्ट्रेलियामध्ये जेवण बनविण्यासंबंधी एक विचित्र कायदा लागू करण्यात आला आहे. जर बारबिक्यू लावून जेवण बनवत असाल तर तुम्हाला 5500 डॉलरचा दंड आणि जेल होऊ शकते. न्यू वेल्स साउथ भागात लाकडू अथवा कोळशाचा वापर करून जेवण बनवण्यास पुर्णपणे बंदी आहे.

हा निर्णय आगीच्या घटना आणि पर्यावरणाला लक्षात ठेऊन घेण्यात आला आहे. या कायद्याअंतर्गत जर कोणी गॅस आणि इलेक्ट्रिक बारबिक्यूच्या जागी लाकूड आणि कोळशाचा वापर करत असेल तर त्याला 2200 डॉलरचा दंड होईल. जर प्रकरण कोर्टात गेले तर दंडाची रक्कम वाढून 5500 डॉलर म्हणजेच 3.92 लाखांचा दंड होईल. दंड न भरल्यास 12 वर्ष कारावासाची शिक्षा देखील होऊ शकते.

सांगण्यात येत आहे की, अशाप्रकारे जेवण बनवल्यामुळे भागातील पर्यावरणाला मोठे नुकसान होत आहे. याशिवाय आग लागण्याच्या घटनेत देखील वाढ झाली आहे. मागील काही दिवसांमध्ये बारबिक्यूमुळे 150 घरात आग लागण्याची घटना घडली आहे. सिडनीतील काही भागांमध्ये देखील याबाबत चेतावनी देण्यात आलेली आहे.

 

Leave a Comment