हॅट्ट्रिकची हॅट्ट्रिक – एकाच वर्षात तिन्ही फॉर्मेटमध्ये हॅट्ट्रिक घेण्याची भारतीय खेळाडूंची ऐतिहासिक कामगिरी

तिसऱ्या व अखेरच्या टी20 सामन्यात बांगलादेशचा पराभव करत भारताने मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावत 174 धावा केल्या. तर बांगलादेशचा संघ 19.2 ओव्हरमध्ये सर्वबाद 144 धावापर्यंतच मजल मारू शकला. या सामन्यात सर्वाधिक लक्षणीय कामगिरी वेगवान गोलंदाज दीपक चहरची ठरली. त्याने सामन्यात हॅट्ट्रिकसह केवळ 7 धावा देत 6 विकेट्स घेतले. ही टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.

मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकवलेला दीपक चहर या वर्षी हॅट्रिक घेणारा तीसरा भारतीय गोलंदाज आहे. 2019 मध्ये सर्वात प्रथम मोहम्मद शमीने एकदिवसीय सामन्यात हॅट्ट्रिक घेतली होती. त्यानंतर जसप्रीत बुमराहने कसोटी सामन्यात व आता दीपक चहरने आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात हॅट्ट्रिक साधण्याची ऐतिहासिक कामगिरी केली

असे पहिल्यांदाच झाले आहे की, एकाच देशाच्या गोलंदाजीनी तिन्ही फॉर्मेटमध्ये हॅट्ट्रिक घेतली आहे. म्हणजेच भारताने 2019 मध्ये हॅट्ट्रिकची हॅट्रिक पुर्ण केली आहे.

मोहम्मद शमीन इंग्लंडमध्ये खेळल्या गेल्या वर्ल्डकप दरम्यान अफगाणिस्तानविरूध्दच्या एकदिवसीय सामन्यात हॅट्ट्रिक घेण्याची कामगिरी केली होती. त्यानंतर जसप्रीत बुमराहने सप्टेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरूध्द सबीना पार्क मैदानावर पार पडलेल्या कसोटी सामन्यात हॅट्ट्रिक घेतली होती. आता दीपक चहरने अशी कामगिरी करत हॅट्रिकची हॅट्रिक पुर्ण केली आहे.

हॅट्ट्रिक घेणारे भारतीय खेळाडू (आंतरराष्ट्रीय क्रिकेट) –

कसोटी – हरभजन सिंह, इरफान पठान, जसप्रीत बुमराह

एकदिवसीय – चेतन शर्मा, कपिल देव, कुलदीप यादव, मोहम्मद शमी

टी20 – दीपक चहर

Leave a Comment