आपल्या नव्या लुकमुळे पुन्हा चर्चेत आला आमिर खान


बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान आपल्या प्रत्येक चित्रपटात हटके लूकमध्ये दिसतो. तो दरवेळेस एका वेगळ्या भूमिकेचा स्वीकार करत ती मोठ्या ताकदीने साकारतो देखील… सध्याच्या घडीला सोशल मीडियावर त्याचा असाच काही एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यात आमिर खान काहीसा अनोख्या लूकमध्ये दिसत आहे.

आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ या आगामी चित्रपटातील लूक सर्वांच्या भेटीला आला आहे. पुन्हा एकदा त्याचा हा लूक पाहता चाहते थक्क झाले आहेत. ‘लाल सिंग चड्ढा’च्या निमित्ताने व्हायरल होणाऱ्या या लूकमध्ये आमिर एका शीख व्यक्तीच्या रुपात दिसत आहे. हलक्या गुलाबी रंगाची पगडी, स्पोर्ट्स शूज, चौकटींचं शर्ट, भरगच्च दाढी असा एकंदर लूक आमिर साकारत असणाऱ्या भूमिकेला चार चाँद लावत आहे.

या चित्रपटामध्ये अभिनेत्री करिना कपूरही झळकणार आहे. टॉम हँक्सची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘फॉरेस्ट गंप’ या चित्रपटाचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा रिमेक आहे. आमिरने या चित्रपटासाठी बरीच मेहनत घेतली असून जवळपास २० किलो वजन घटवल्याचे म्हटले जात आहे. आता ज्या भूमिकेसाठी हा परफेक्शनिस्ट आमिर एवढी मेहनत घेत आहे ती भूमिका नेमकी कशी आहे, हे येत्या काळात पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment