युट्यूबच्या नियमांमध्ये मोठा बदल


नवी दिल्ली – व्हिडिओ प्रसिद्धी वापर केल्या जाणाऱ्या युटयूबच्या सेवा नियमांमध्ये बदल करण्यात येत असून, १० डिसेंबरपासून नवे बदल लागू होत आहेत. या बदलांमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जर व्यावसायिकदृष्ट्या एखादे युट्यूब अकाऊंट चालवणे कंपनीला शक्य नसेल, तर ते युट्यूबकडून बंद केले जाऊ शकते. एकतर्फीपणे एखादे अकाऊंट युट्यूब बंद करू शकते. युटूयबकडून सेवा नियमातील बदलांसंबंधीची माहिती देणारे ई-मेल्स वापरकर्त्यांना पाठविण्यात येत आहेत.

युट्यूबच्या नव्या सेवा नियमांमध्ये सर्वात मोठा बदल असा आहे की, तुमचे युट्यूब किंवा गूगल अकाऊंट जर व्यावसायिकदृष्ट्या चालवणे परवडत नसल्याचे तर ते कंपनीला दिसल्यावर बंद करण्याचा निर्णय कंपनी आपल्या पूर्ण अधिकारात घेऊ शकते. युट्यूबकडून हा निर्णय पारदर्शकता वाढविण्यासाठी आणि ऑनलाईन ग्राहकांशी कटिबद्ध राहण्यासाठी घेतला जाऊ शकतो. हे व्यासपीठ व्हिडिओ प्रसिद्ध करण्यासाठी कशा पद्धतीने काम करते आणि त्याचे सेवा नियम काय आहेत, यामध्ये एकवाक्यता आणण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.

या बदलांबद्दल युट्यूबवर चॅनेल चालविणारे प्रकाशक फारसे समाधानी नाहीत. त्याचबरोबर गोंधळात आणखी भर टाकणारी या सेवा नियमांची वाक्यरचना असल्याचे काही वापरकर्त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, कोणत्याही सामान्य चॅनेल किंवा अकाऊंटवर युट्यूब कारवाई करणार नाही. पण काहीजण आपल्याकडील दृश्ये केवळ ऑनलाईन व्यासपीठावर साठविण्यासाठी युट्यूबचा वापर करतात. हा मजकूर ते प्रसिद्ध करीत नाहीत. युट्यूबने हा निर्णय त्यांच्यावर कारवाईसाठीच घेतला आहे, असे एका वापरकर्त्याने म्हटले आहे.

Leave a Comment