90 रुपयात घेतलेली फुलदाणी निघाली 300 वर्ष जुनी, विकली गेली 4.4 कोटीला

कधी कोणाचे नशीब बदलेल हे सांगता येत नाही. असेच काहीसे चीनमधील एका व्यक्तीबरोबर झाले आहे.  युनायटेड किंगडममधील एका व्यक्तीने हार्टफोर्टशायर येथील चॅरिटी शॉपमधून 90 रूपयात (1 पाउंड) एक फुलदाणी खरेदी केली होती. त्यावेळी त्या व्यक्तीला या फुलदाणीचे महत्त्व माहीत नव्हते. काही दिवसांनी या व्यक्तीने ही फुलदाणी ईबेवर विकण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी खरेदी करण्यासाठी असंख्य ऑफर आल्या.

एवढ्या ऑफर येत असल्याने अखेर या व्यक्तीने या फुलदाणीचा लिलाव केला. आश्चर्य म्हणजे 1 पाउंडमध्ये खरेदी केलेल्या या फुलदाणीसाठी लिलावात तब्बल 3.48 कोटी रुपयांची बोली लागली. सर्व टॅक्स जोडल्यानंतर फुलदाणीची किंमत 4.4 कोटी रुपयांपर्यंत पोहचली.

ही खास फुलदाणी 18व्या शकतात चीनी सम्राट कियानलाँगसाठी (शासनकाळ 1735 ते 1796) बनविण्यात आली होती. फुलदाणीवर कियानलाँगच्या राजवंशाची मोहर देखील लावलेली असे. फुलदाणीवर राजवंशाची प्रशंसा करणारी कविता देखील कोरली जात असे. याच्यावर ‘Weijing weiyi’ असे लिहिलेले आहे. या शब्दांचा अर्थ अचूक रहा, अविभाजित रहा असा होतो. तब्बल 300 वर्षांनंतर ही फुलदाणी समोर आली आहे.

Leave a Comment