‘पानिपत’मधील झीनत अमान यांचा फर्स्ट लुक रिलीज


70 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान या सध्या चर्चेत आहेत. ‘पानीपत’ चित्रपटाद्वारे बर्‍याच दिवसानंतर झीनत रुपेरी पडद्यावर पुनरागमन करीत आहे. त्या या चित्रपटात सकीना बेगमच्या भूमिकेत दिसणार आहेत.

आशुतोष गोवारीकर यांच्या ‘पानिपत’ या चित्रपटातील संजय दत्त, कृती सॅनॉन आणि अर्जुन कपूर यांचा फर्स्ट लूक रिलीज झाल्यानंतर झीनत अमानचा लूकही रिलीज झाला आहे. असे म्हणतात की या चित्रपटात झीनत अमान यांची भूमिका खूप महत्वाची आहे. पोस्टरमध्ये झीनत अमान राणीच्या भूमिकेत दिसत आहेत. पानिपतच्या युद्धामध्ये सकीनाची महत्त्वपूर्ण भूमिका होती.

पानिपत या चित्रपटात अर्जुन कपूर सदाशिव राव भाऊची भूमिका साकारत आहे, तर कृती पत्नी पार्वतीबाईच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर संजय दत्त दुर्रानी साम्राज्याचे संस्थापक आणि अफगाणिस्तानचा शासक अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत दिसणार आहे.

1761 मधील पानिपतच्या तिसर्‍या युद्धावर हा चित्रपट आधारित आहे. ‘पानीपत’ 06 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केले आहे. संवाद अशोक चक्रधर यांनी लिहिले आहेत.

Leave a Comment