सेंद्रीय अन्न कशासाठी ?


सध्या ऑरगॅनिक अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो पण त्याचे नेमके काय फायदे आहेत याचे ज्ञान सर्वांनाच असते असे नाही. ते आपण समजून घेतले पाहिजेत. १. सेंद्रीय खाद्य पदार्थ हे रसायनांपासून मुक्त असतात. ही रसायने अनेकदा प्राणघातक असतात. सेंद्रीय अन्न खाल्ल्याने या घातक रसायनांपासून आपली सुटका होते. २. रासायनिक खतांचा वापर करून पिकवलेल्या अन्नापेक्षा सेंद्रीय अन्नात पोषक तत्त्चांचे प्रमाण अधिक असते. ज्या जमिनीत हे धान्य उगवले जाते ती जमीनही रसायनांपासून मुक्त असल्याने या धान्यात आणि भाज्यां, फळांत पोषक द्रव्ये विपुुल असतात. ३. सेेंद्रीय खाद्यपदार्थ हे चवीलाही चांगली असतात. रसायनांचा वापर होत नसल्याने या पदार्थांची मूळ नैसर्गिक चव राखली जात असतेे.

४. मुळात धान्ये, फळे आणि भाज्या या रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असतात पण त्यांच्यासाठी रासायनिक खतांचा वापर होतो तेव्हा हा गुणधर्म नष्ट होतो. सेंद्रीय मालात हा गुणधर्म टिकून राहिलेला असतो. ५. सेंद्रीय अन्न पदाथार्र्ंत कॉज्युगेटेड लिनोलीक ऍसिड हे मोठ्या प्रमाणावर असल्याने सेंद्रीय पदार्थ आपल्या हृदयाचे चांगले रक्षण करतात. ६. भूक भागवण्याच्या बाबतीत सेंद्रीय पदार्थ सक्षम असतात. कारण त्यांच्यात सत्त्व असते. उलट जनुकीय बदल केलेल्या आणि रसायनांचा वापर करून वाढवलेल्या अन्नात सत्त्व नसते. ते पदार्थ कितीही खाल्ले तरीही पोट भरल्याची भावना होत नाही.

७. सेन्द्रीय पदार्थ जतन करून ठेवण्यासाठी प्रिझर्व्हेटिव्ह वापरावे लागत नाहीत. त्यामुळे ते खाणार्‍यांची त्यांच्यातल्या विषारी द्रव्यांपासून सुटका होते. काही प्रिझर्व्हेटिव्हज तर कर्करोगाला निमंंत्रण देणारे असतात. ८. सेंद्रीय पदाथार्र्ंच्या शेतीसाठी रासायनिक द्रव्ये, खते, कीटक नाशके आणि तणनाशके वापरलीच जात नसल्याने पर्यावरणाचेही रक्षण होते. अन्यथा ही रसायने प्रदूषण बिघडवत असतात. ९. सेंद्रीय शेती करताना जनावरांची निगा वेगळ्या प्रकाराने घेतली जात असते. त्यामुळे सेंद्रीय शेतीला जोेडून केल्या जाणार्‍या पशुपालनात चांगली जनावरे कतलीसाठी उपलब्ध होत असतात. १० शेतकर्‍यांना मदत. सेंद्रीय शेतीत शेतकर्‍यांना बाजारातून कमीत कमी वस्तू आणाव्या लागतात. त्यांचा रासायनिक खतावरचा भार कमी झालेला असतो आणि शेती अधिक किफायतशीर होत असते. यावरही कोणाला सेंद्रीय पदार्थांचे महत्त्व लक्षात येत नसेल तर त्यांनी दोन ते तीन दिवस आवर्जुन केवळ सेंद्रीय अन्न खाण्याचा अनुभव घेऊन पहावा. त्यांना असा अनुभव येईल की त्यावर या पदार्थांचे महत्त्व सांगण्याचीही गरज राहणार नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment