हेरगिरी करण्यासाठी हॅक करुन वापरले जातात ‘हे’ स्मार्टफोन


डेटा लीक होण्याची प्रकरणे गेल्या काही दिवसांपासून अधिकाधिक वाढली आहेत. त्यानुसार हेरगिरीसाठी जगातील काही पॉप्युलर स्मार्टफोन हॅक करुन त्यांचा उपयोग केला जात असल्याची धक्कादायक बाब एक रिपोर्टमध्ये समोर आली आहे. सिक्युरिटी रिसर्च यांनी असे सांगितले आहे की, एखाद्या युजर्सचा स्मार्टफोन Bluetooth आणि USB सारख्या एक्ससरिजचा वापर करुन हॅक केला जातो. त्याचबरोबर यासाठी एटी कमांडचा सुद्धा आधार घेतला जातो. स्मार्टफोनमध्ये एटी कमांडचा उपयोग करुन बेसबॅन्ड सॉफ्टवेअर सोबत कम्युनिकेशन करण्यासाठी वापरला जातो.

रिपोर्टनुसार या ट्रिकचा हॅकर्स विविध प्रकारे उपयोग करु शकतात. म्हणजेच हॅकर्स IMEI आणि IMSI क्रमांक, कॉल्समध्ये व्यत्यय, फोन दुसऱ्या क्रमांकावर डायवर्ड करणे, कॉलिंग फिचर ब्लॉक करणे किंवा इंटरनेट एक्सेस बंद करण्यासाठी एटी कमांडचा वापर करतात. तर टेक वेबसाईट टेकक्रंचने दिलेल्या रिपोर्टमते, हेरगिरी स्मार्टफोन हॅक करुन केली जात असल्याची बाब समोर आली आहे.

एक बेसबॅन्ड प्रोसेसर आणि एक अॅप्लिकेशन प्रोसेसर सर्व स्मार्टफोनमध्ये देण्यात येतो. तर एपी एक साधारण प्रोसेसर असून तो बेसबॅन्ड प्रोसेरसचे काम सेल्युलर कनेक्टिव्हिटीसाठी रेडिओ संबंधित काम करतात. अॅप्लिकेशन प्रोसेसर बेसबॅन्ड प्रोसेसर सोबत जोडण्यासाठी एटी कमांड देतो. हॅकर्सला त्यामुळे या पद्धतीचा उपयोग करुन युजर्सचा डेटा किंवा स्मार्टफोन हॅक करुन हेरगिरी करणे शक्य होते.

हेरगिरीसाठी केला जातो या स्मार्टफोनचा वापर :

  • Samsung Galaxy S8+
  • Samsung Galaxy S3
  • Samsung Note 2
  • Huawei P8 Lite
  • Huawei Nexus 6P
  • Google Pixel 2
  • LG G3
  • LG Nexus 5
  • Motorola Nexus 6
  • HTC Desire 10 Lifestyle

Leave a Comment