सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपला संजय राऊत यांच्या शुभेच्छा


मुंबई – शनिवारी तेराव्या विधानसभेची मुदत संपुष्टात आली असून, सरकार स्थापण्याबाबतची प्रक्रिया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सुरू केली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करत राज्यातील अस्थिरता संपावी हीच आमची भूमिका असल्याचे म्हटले आहे.

निकालानंतर २४ तासांत जाऊन भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करायला हवा होता. पण सत्ता स्थापन करायला ऐवढा वेळ भाजपने का लावला माहित नाही. सत्तास्थापनेच्या संधीचा भाजपने लाभ घ्यायला हवा. भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमच्याकडून शुभेच्छा, असे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, योग्य वेळी योग्य निर्णय घेणारा उद्धव ठाकरे यांच्याइतका चाणाक्ष नेता राज्यात नसल्याचेही संजय राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.

Leave a Comment