आपल्या छातीवर सैन्याचे बलिदान चिन्ह लावून धोनीने जिंकला टेनिस सामना


रांची – याच वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीनंतर क्रिकेट मैदानापासून दूर असलेला भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी नुकताच टेनिस कोर्टवर हजर झाला. पण यावेळी त्याच्या हातात बॅट ऐवजी टेनिस रॅकेट होते आणि त्याने भारतीय सेनेचा बलिदान बॅज छातीवर लावून टेनिस स्पर्धेचा सामना सरळ सेटमध्ये जिंकला.

धोनीने बलिदान बॅच टी-शर्ट परिधान करून टेनिस स्पर्धेतील दुहेरीच्या सामन्यात प्रवेश केला आणि पहिल्या जोडीला आपल्या जोडीदारासह विरोधी दुहेरीत 6-0, 6-0 ने पराभूत केले. रांचीमधील जेएससीए येथे ही स्पर्धा सुरू आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार धोनी टेनिस कोर्टात दाखल होताच, तेथे उपस्थित असलेले प्रेक्षक त्याच्या हातात रॅकेट पाहून स्तब्ध झाले. क्रिकेट सामन्यांत ग्लोव्ह्जवर बलिदान बॅच परिधान करणार्‍या धोनीने ब्लॅक टी-शर्ट घातली होती, ज्यावर व्हाइट रंगाचा बलिदान बॅच लावला होता. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत धोनीचे ग्लोव्हज मोठ्या वादात सापडले होते. आयसीसीच्या हस्तक्षेपामुळे धोनीला पहिल्या सामन्यानंतर विकेटकीपिंग ग्लोव्हजवरुन भारतीय सैन्याचा बलिदान बॅच काढून टाकण्यास भाग पाडले गेले.

Leave a Comment