
मुंबई : राज्यपाल भगत सिंह काश्योरी यांनी राज्यात विधानसभा निवडणुकांच्या निकालात सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. आज वर्षावर याबाबतच्या चर्चेसाठी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. भाजपने या बैठकीत सत्तास्थापनेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शिवसेना जर सरकार बनवणार असेल, तर भाजप विरोधात बसणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे भाजपमध्ये दोन गट तयार झाले आहेत.
शिवसेना जर सरकार बनवणार असले तर विरोधात बसणार भाजप !
भाजपच्या प्रमुख नेत्यांनी या कोअर कमिटीच्या बैठकीत गृहमंत्री अमित शहांसोबत चर्चा केली. जर शिवसेना सरकार बनवत असेल, तर भाजप विरोधात बसायला तयार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे भाजपमध्ये दोन गट तयार झाले आहेत. तसेच विश्वासदर्शक ठराव मांडण्यावरुन एकमत न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान कोअर कमिटीची बैठक नुकतीच संपली असून यानंतर संध्याकाळीच्या दरम्यान वर्षा बंगल्यावर पुन्हा एका बैठकीचे आयोजन केले आहे. सत्तास्थापनेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत होणार आहे. यात राज्यपालांनी दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणाबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर भाजप जनतेसमोर भूमिका मांडणार आणि निर्णय राज्यपालांना कळवणार असल्याची माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. दरम्यान या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
