हातात वाडगे घेऊन वर्गात डोकावणाऱ्या मुलीचा फोटो व्हायरल; शाळेने दिला प्रवेश


हैदराबाद – शहरातील सरकारी शाळेत मिळणाऱ्या मध्याह्न भोजनानंतर उरलेला अन्न मिळण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या दिव्याला अखेर त्याचा शाळेत प्रवेश मिळाला आहे, ज्या शाळेत ती रिकामे वाडगे घेऊन वर्गात डोकावणाऱ्या दिव्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला होता. या फोटोला मीडियाने भुकेलेले डोळे असे शीर्षक दिलेले होते. हा फोटो गुडीमालाकपूर हायस्कूलमध्ये देवल झाम सिंह यांनी काढला होता.

ती मुलगी शाळेची विद्यार्थी नव्हती, पण ती एकवेळचे जेवण मिळावे म्हणून दररोज शाळेत यायची. मुलीचे पालक जवळच्या झोपडपट्टीत राहतात. वडील कचरा गोळा करण्याचे काम करतात आणि आई सफाई कामगार म्हणून काम करते. शाळेतील प्रवेशानंतर दिव्याला आता दररोज मध्यान्ह भोजन मिळेल.

व्हायरल फोटो एनजीओ एमव्ही फाऊंडेशनचे राष्ट्रीय समन्वयक व्यंकट रेड्डी यांनी देखील पाहिला आणि मुलीला हक्क मिळवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी हा फोटो शेअर करताना, लज्जास्पद, एका मुलीला शिकण्याचा आणि खाण्याचा हक्क मिळात नाही, असे लिहिले. यानंतर, त्यांनी स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंसेवकाशी संपर्क साधला आणि मुलीला त्याच शाळेत प्रवेश मिळवून दिली. एवढेच नाही तर ते तिच्या पालकांनाही भेटले. पहिल्याच दिवशी मुलगी गणवेशात शाळेत पोहोचली तेव्हा तिचे त्यावेळेचे फोटो देखील रेड्डी यांनी फेसबुकवर शेअर केले आहेत.

Leave a Comment