रामजन्मभूमिवरील निर्माणधीन मंदिरासाठी सोन्याची विट देणार बाबरचा वंशज


नवी दिल्ली – बाबरचा वंशज आणि मोगल बादशहा बहादूर शाह जफरचा नातू याकुब हबीबुद्दीन उर्फ प्रिन्स तुसी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत असे म्हटले आहे की, बाबरच्या नावाची बदनामी करणार्‍यांना एक धडा शिकवला आहे. ते म्हणाले की हा सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय असेल जो आपण सर्वांनी मनापासून स्वीकारला पाहिजे. अयोध्या हे श्री रामांचे जन्मस्थान आहे, तेथे एक भव्य मंदिर असलेच पाहिजे.

ते म्हणाले की, रामजन्मभूमीसाठी आम्ही याआधी सोन्याची विट देण्याचे म्हटले होते, त्यानुसार आम्ही मंदिरासाठी सोन्याची विट देणार आहोत. त्याचबरोबर ते म्हणाले की आपण सर्वांनी मिळून राम मंदिर बनवावे जेणेकरून आपल्या देशात आणि लोकांमध्ये किती सामंजस्य आहे हे लोकांना कळेल आणि यावरुन राजकारण करणाऱ्यांचे राजकारण कायमचे संपले आहे.

Leave a Comment