अयोध्येत मिळालेल्या 5 एकरात एखाद्या शाळेचे निर्माण करा – सलीम खान


शनिवारी सुप्रीम कोर्टाने दीर्घकाळ चाललेल्या अयोध्या प्रकरणावर निकाल दिला. मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील-न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने अयोध्येत रामजन्मभूमी येथे भगवान राम यांचे भव्य मंदिर निर्माण करण्याला परवानगी दिली. त्याचबरोब सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी इतरत्र 5 एकर जागा अन्य ठिकाणी द्यावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. बॉलिवूडच्या विविध सेलिब्रेटींनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

प्रसिद्ध लेखक, चित्रपट निर्माता आणि अभिनेता सलमान खान यांचे वडील सलीम खान यांनीही या संदर्भात आपले मत मांडले. ते म्हणाले की, अयोध्येत मुस्लिमांना मिळालेल्या पाच एकर जागेवर शाळा बांधावी.

सलीम खान म्हणाले, ‘भारतातील मुस्लिमांना मशिदीची नव्हे तर शाळेची आवश्यकता आहे. पैगंबरांनी इस्लामची दोन वैशिष्ट्ये दिली आहेत ज्यात प्रेम आणि क्षमा यांचा समावेश आहे. सलमानच्या वडिलांनी मुस्लीम समुदायाला आवाहन केले आणि म्हणाले, आता ही कहाणी (अयोध्या वाद) संपुष्टात आली आहे, तेव्हा मुस्लिमांनी या दोन वैशिष्ट्यांनुसार पुढे जावे. प्रेम व्यक्त करा आणि क्षमा करा आणि यापुढे हा मुद्दा पुन्हा उकरुन काढू नका.

भारतीय समाजाच्या परिपक्वपणाबद्दल बोलताना सलीम खान पुढे म्हणाले, निर्णय आल्यानंतर शांतता व सौहार्दाची पद्धत ज्या प्रकारे कायम ठेवली गेली ती कौतुकास्पद आहे. आता ते स्वीकारा. एक जुना वाद संपला. या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. मुस्लिमांनी आता मूलभूत समस्यांविषयी चर्चा करुन त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी अशी चर्चा करीत आहे कारण आम्हाला शाळा आणि रुग्णालयाची आवश्यकता आहे. अयोध्येत मशिदीसाठी पाच एकर जागेवर महाविद्यालय बांधले गेले तर बरे होईल.

सलमानचे वडील म्हणाले, आम्हाला मशिदीची गरज नाही, आम्ही कोठेही पठण करु शकतो… ट्रेनमध्ये, विमानात, जमिनीवर, पण आम्हाला एक उत्तम शाळा हवी आहे. 22 कोटी मुस्लिमांचे शिक्षण चांगले होईल, या देशातील अनेक उणीवा दूर होतील.

अनेक हिट चित्रपटांचे संवाद आणि कथा लिहिणारे सलीम खान म्हणाले की, पंतप्रधान मोदी शांततेचा आग्रह धरतात आणि मी त्यांच्याशी सहमत आहे. आज आपल्याला फक्त शांतता हवी आहे. आपण आपल्या भविष्यावर विचार केला पाहिजे. आपल्याला हे माहित असले पाहिजे की सुशिक्षित समाजात चांगले भविष्य आहे. मुख्य मुद्दा हा आहे की मुस्लिम शिक्षणात मागास आहेत, म्हणून मी पुन्हा सांगतो की चला या (अयोध्या विवाद) वादावर पडदा टाकू आणि नवी सुरुवात करू.

Leave a Comment