टॉयलेट पेपर खाण्याचा आजार जडला आहे या मुलाला


मुंबई – एका असा दुर्मिळ आजार दक्षिण आफ्रिकेमधील १० वर्षांच्या मुलाला जडला आहे की तो या आजारामुळे अगदी टॉयलेट पेपरसुद्धा खातो. या मुलाचे नाव का़डेन बेंजामिन असे असून आताच त्याचे वजन हे ९० किलोंच्या आसपास आहे. या दुर्धर आजाराचे नाव प्राडर विलि सिंड्रोम असे आहे. तो या आजाराने लहानपणापासून ग्रस्त असून त्याला या आजारामुळे सतत काहीना काही खाण्याची सवय लागली आहे. कधीकधी त्याची भूक ऐवढी अनावर होते की तो समोर दिसेल ते खातो असेही त्याच्या आईने सांगितले आहे.

त्याला काहीवेळा मिळाले नाही की टॉयलेट पेपरचा रोल तो खातो. तो कधीकधी जे पेपर दिसतील ते तोंडात टाकतो. त्याची परिस्थिती ऐवढी वाईट आहे की त्याचा भुकेवर ताबा राहिला नाही की तो कचऱ्यातूनही काहीतरी खायला शोधत असतो असेही त्याच्या आईने डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. काडेनच्या या सवयीमुळे त्याच्या कुटुंबियांना सतत त्याच्यावर लक्ष ठेवावे लागते. काडेन तीन वर्षांचा होता तेव्हा त्याचे वजन ४० किलो होते. त्याला काय होत आहे हे सुरूवातीला त्याच्या कुटुंबियांना कळत नव्हते. त्याच्यावर अनेक उपचारही करण्यात आले पण याचा काहीच उपयोग झाला नाही.

Leave a Comment