एक तृतीयांश जग बनले आहे अतिलठ्ठ


जगातील एक तृतीयांश अतिवजनदार किंवा अतिलठ्ठ बनले आहे, असे शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनात आढळून आले आहे.

जगातील 73 देशांमध्ये मुले व प्रौढांमधील लठ्ठपणाचा वेग 1980 पासून दुप्पट झाला आहे आणि इतर अनेक देशांमध्ये तो वढत आहे, असे या अहवालात म्हटले आहे. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन या नियतकालिकात हा अहवाल प्रकाशित झाला असून सोमवारी तो जाहीर करण्यात आला.

गरीब व श्रीमंत या दोन्ही देशांमध्ये वजनाची समस्या वाढत आहे. त्यामुळे अतिलठ्ठपणाशी संबंधित आजारांमुळे मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्याही वाढत आहे. जागतिक सार्वजनिक आरोग्याची ही अस्वस्थ करणारी समस्या आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे. या संशोधकांनी 1980 ते 2015 पर्यंतच्या आरोग्याच्या नोंदींचा अभ्यास केला. त्यांनी 195 देशांतील लठ्ठपणाचा दर, सरासरी वजनवाढ आणि मृत्यूची कारणे यांचा अभ्यास केला. त्यात चीन, ब्राझील व भारतात युवक व नवतरुणांमध्ये लठ्ठपणाचा वेग तिप्पट जास्त असल्याचे त्यांना आढळले.

“वजन वाढण्याकडे जे दुर्लक्ष करतात ते स्वतःच्या जीवाशी खेळतात,”असे संशोधकांच्या चमूचे सदस्य ख्रिस्तोफर मरे यांनी सांगितले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment