1 सेंकदात तब्बल 30 निर्णय घेऊ शकतो हा ‘चित्ता’ रोबॉट

मॅसेच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या बायोमेटिक रोबोटिक्स लॅब्रोटरीने चार पायांचा मिनी रोबॉट तयार केला आहे. याला मिनी चित्ता असे नाव देण्यात आले आहे. 12 मोटर वाल्या या रोबोट्सला रिमोटद्वारे कंट्रोल केले जाऊ शकते. या रोबॉटचा टॉप स्पीड ताशी 14 किमी आहे. हा रोबॉट 1 सेंकदात 30 निर्णय घेऊ शकतो. कोणत्याही परिस्थिती संतूलन गेल्यावर तो मागे किंवा पुढे पलटून रनिंग पोजिशनमध्ये येतो. या रोबॉट्समध्ये चित्त्याप्रमाणे हलक्या पावलांनी चालण्याची शैली आहे.

प्रोफेसर सेंगबेइ किम म्हणाले की, मला युट्यूबवर अफ्रिकन चित्ता बघायला आवडते. त्याच्या सुंदरतेमुळे प्रभावित होऊन मी माझे दोन विद्यार्थी बेन काट्ज आणि जेरेड डी कार्लो यांना चित्त्यासारखा रोबॉट बनविण्यास सांगितले. या मिनी चित्ता आणि खऱ्या चित्त्याच्या वेगात 10 पट अंतर आहे. अफ्रिकन चित्ता ताशी 140 किमी वेगाने धावतो, तर हा मिनी चित्ता 14 किमी वेगाने धावतो.

प्रोफेसर किमनुसार, रोबोटला 360 डिग्रीमध्ये फिरवणे हे कठीण काम आहे. तर त्याला उलटे करून परत सरळ करण सोपे आहे. यामध्ये सॉफ्ट लँडिंगचे देखील आव्हान होते. लँडिंग योग्य न झाल्यास पुन्हा रोबॉट उडी मारू शकत नाही.

 

Leave a Comment