जाणून घ्या अयोध्या निकाल देणाऱ्या 5 न्यायाधीशांविषयी

रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. वादग्रस्त जागा ही राममंदिरासाठी देण्यात आली असून, मशिदीसाठी दुसरी पर्यायी जागा देण्यात येईल असे न्यायालयाने म्हटले आहे. रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिला.

या निर्णयानंतर रंजन गोगोई यांच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली असून, त्यांना झेड श्रेणीची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. हा ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांविषयी जाणून घेऊया.

(Source)

सरन्यायाधीश रंजन गोगोई –

18 नोव्हेंबर 1954 ला जन्म झालेल्या रंजन गोगोई हे 1978 मध्ये बार काउसिंलमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी गुवाहाटी उच्च न्यायालयातून प्रॅक्टिस सुरू केली होती. 28 फेब्रुवारी 2001 ला ते गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. 2010 साली त्यांचे पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात ट्रांसफर झाले. 12 फेब्रुवारी 2011 ला ते पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. 2012 मध्ये ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. त्यानंतर 2018 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.

(Source)

न्यायाधीश एसए बोबडे –

न्यायाधीश  शरद अवरिंद बोबडे यांचा जन्म 1956 रोजी नागपूर येथे झाला आहे. त्यांनी नागपूरमधूनच बीए एलएबीची डिग्री घेतली.  1978 मध्ये ते महाराष्ट्र बार कॉन्सिलमध्ये सहभागी झाले व त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रॅक्टिस करण्यास सुरूवात केली. वर्ष 2000 मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नेमण्यात आले. 2012 मध्ये ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश झाले. 2013 मध्ये न्यायमूर्ती बोबडे यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले.  23 एसए बोबडे एप्रिल 2021 रोजी निवृत्त होतील.

(Source)

न्यायाधीश डीवाय चंद्रचूड –

दिल्लीच्या सेंट स्टिफेंस कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी आणि त्यानंतर दिल्ली युनिवर्सिटीमधून त्यांनी एलएलबीची पदवी घेतली. 23 मे 2016 ला ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. त्यांनी एलएलएमची डिग्री हॉवर्ड लॉ स्कूलमधून घेतली आहे.

सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्याआधी ते अलाहाबाद उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश आणि त्याआधी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. 1999 मध्ये ते एसएजी देखील होते. चंद्रचूड मुंबई युनिवर्सिटी आणि ओक्लाहोमा युनिवर्सिटीत व्हिजिटिंग प्रोफेसर देखील होते.

(Source)

 

न्यायाधीश अशोक भूषण –

न्यायाधीस अशोक भूषण यांचा जन्म 5 जुलै 1956 रोजी उत्तर प्रदेशच्या जौनपुर येथे झाला. त्यांनी अलाहाबाद युनिवर्सिटीतून बीए आणि एलएलबीएची डिग्री घेतली. 1979 मध्ये ते उत्तर प्रदेश बार कॉउंसिलचे ते सदस्य झाले. 2001 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. 2014 मध्ये त्यांना केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नेमण्यात आले. त्यानंतर 2015 मध्ये ते केरळ उच्च न्यायालयात न्यायाधीश देखील होते. 13 मे 2016 रोजी न्यायमूर्ती त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले.

(Source)

 

न्यायाधीश एसए नजीर –

1958 ला जन्म झालेल्या एस ए नजीर यांनी 1983 मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयात वकिल म्हणून काम करण्यास सुरूवात केली. 2003 मध्ये ते कर्नाटक उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश झाले. 2004 मध्ये त्यांना कर्नाटक उच्च न्यायालाचे न्यायाधीश करण्यात आले. 2017 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आली.

Leave a Comment