सुझुकी लवकरच भारतात करणार इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्टिंग

ऑटोमोबाईल इंडस्ट्री हळूहळू इलेक्ट्रिक गाड्यांच्या निर्मितीकडे वळताना दिसत आहे. बाजारात देखील इलेक्ट्रिकल गाड्यांना मोठी मागणी आहे. आता जापानची ऑटोमोबाईल कंपनी सुझुकी लवकरच भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्टिंग करणार आहे. मात्र इलेक्ट्रिक स्कूटरची मार्केटिंग सुरू करण्यापुर्वी कंपनी इंफ्रास्ट्रक्चर तयार होण्याची वाट पाहू शकते.

सुझुकी मोटारसायकल इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर सतोशी उचिदा म्हणाले की, आम्ही सरकारच्या पॉलिसींचा सन्मान करतो. आम्ही काही प्रोटोटाइप्स तयार करू. मात्र सध्या कोणतेही इंफ्रास्ट्रक्चर नाहीये.

सतोशी यांनी सांगितले की, आम्ही त्याच टेक्नोलॉजीचा वापर करून मारूतीसोबत भागिदारी करू शकतो. आम्ही केवळ टेक्नोलॉजीच नाही तर नेटवर्कचा देखील वापर करू शकतो. हा आमचा आणखी एक फायदा आहे.

बजाजने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर चेतकवरी पडदा काही दिवसांपुर्वीच हटवला होता. बजाज जानेवारी 2020 मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे.

सतोशी म्हणाले की, प्रत्येक टेक्नोलॉजी प्रमाणेच इलेक्ट्रिक गाड्यांना स्विकारण्यास वेळ लागेल. आम्हाला माहिती आहे की, इलेक्ट्रिक स्कूटर्स त्वरित यशस्वी होणार नाहीत. याला वेळ लागेल. आम्ही लक्ष ठेवून आहोत.

 

Leave a Comment