कॅन्सरला मुळापासून नष्ट करण्यासाठी या ठिकाणी तयार होत आहे व्हायरस

जगभरातील कॅन्सरग्रस्तांसाठी चांगली बातमी आहे. वैज्ञानिकांनी कॅन्सर ठीक करण्यासाठी Cowpox व्हायरस तयार केला आहे. या ट्रिटमेंटचे नाव CF33 असे आहे. ज्यात पेट्री डिशमधील प्रत्येक प्रकारचा कॅन्सर पुर्णपणे नष्ट करण्याची क्षमता आहे. ट्यूमरला संकुचित करण्यास देखील हा व्हायरस मदत करेल.

सध्या अमेरिकेचे कॅन्सर विशेषज्ञ प्रोफेसर यमन फोंग या ट्रिटमेंटचे परिक्षण करत आहे. हा व्हायरस ऑस्ट्रेलियाची बायोटेक कंपनी Imugene ने तयार केले आहे. सांगण्यात येत आहे की, पुढील वर्षीपासून स्तन कॅन्सर आणि अन्य कॅन्सरग्रस्तांवर या ट्रिटमेंटचे परिक्षण करण्यात येईल.

लवकरच याच्या ट्रायलसाठी व्हायरस जगभरात पाठवला जाणार आहे. या काळात ट्रिपल नेगेटिव्ह स्तन कॅन्सर, मेलेनोमा, फुफुसांचा कॅन्सर, मुत्राशय, गॅस्ट्रिक आणि इतर कॅन्सरवर क्लिनिकल स्टडी केले जाईल.

उदरांवर करण्यात आलेल्या परिक्षणानंतर हा व्हायरस मनुष्याच्या उपचारासाठी वापरण्यात येईल की नाही याबाबत शंका आहे. मात्र प्रोफेसर फोंग हे सकारात्मक विचार करतात. कारण या प्रकारचे अन्य व्हायरस मनुष्यातील कॅन्सरशी लढण्यास प्रभावी ठरले आहेत.

प्रोफेसर फोंग सांगतात की, जो व्हायरस सामान्य सर्दीसाठी होता, वैज्ञानिकांनी त्याला मेंदूच्या कॅन्सरवरील उपचारामध्ये बदलले.

प्रोफेसर फोंग पुढे सांगतात की, कॉउपॉक्स व्हायरस जो 200 वर्षांपुर्वी स्मॉलपॉक्सपासून वाचवण्यासाठी फायदेशीर ठरत होता. आम्ही अन्य व्हायरससोबत हा व्हायरस एकत्र करून परिक्षण केले तेव्हा दिसले की, हा व्हायरस सर्व प्रकारचा कॅन्सर नष्ट करू शकतो.

 

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment