रंग बदलण्यापासून ते थरथरण्यापर्यंत तळहातामुळे समजतात आजाराची लक्षणे

तळहातांचा बदलणारा रंग हे आजारी पडण्याची लक्षणे असतात. रक्त प्रवाहावर होणारा परिणाम, प्रतिकारशक्ती कमी होणे आणि लिव्हरच्या संबंधीत समस्या तळहातांच्या रंगावरून समजतात. जे बदल दिसतात, ते केवळ एक लक्षण असते, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

तळहात लाल होणे –

जर अनेक दिवसांपासून तुमचा तळहात लाल असेल तर ही सामान्य गोष्ट नाही. हे लिव्हरच्या समस्येचे संकेत आहेत. अनेक दिवसांपासून तळहात लाल असेल तर त्वरित डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. सर्वसाधारणपणे 50 वर्षांवरील व्यक्तींमध्ये ही समस्या आढळते. तर गर्भवती महिलेत रक्त संचारण वाढल्याने हात लाल दिसू लागतात.

खूप घाम येणे –

काही लोकांना तळहाताला खूप घाम येतो. तणाव किंवा ओव्हरएक्टिव थायरॉइड याचे कारण असू शकते. कधी कधी हाताला घाम येणे सामान्य गोष्ट आहे. मात्र सामान्य तापमानात देखील तळहातावर घाम येत असेल तर ही हायपरहाइड्रोसिसची लक्षण आहेत. हे ह्रदय रोग, डायबेटीज, तणाव सारख्या आजारांचे लक्षण आहे.

 तळहात रखरखीत होणे –

धंडीमध्ये तळहात रखरखीत कोरडे पडतात. वारंवार तळहात रखरखीत राहिला तर हे डिहायड्रेशन आणि हार्मोन एस्ट्रोडनच्या कमी मुळे होते. यापासून वाचण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. तळहात मऊ आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी मॉइश्वरायजिंग हँड क्रिमचा वापर करावा. आहारात मासे, भाज्या यांचे सेवन करा. जर नखे देखील कमकुवत असतील तर शरीरात जिंकचे प्रमाण कमी आहे. अशावेळी तीळ, शेंगदाणे, ओट्स हे खा.

तळहातावर पिवळेपणा –

तळहातावार पिवळेपमा दिसणे ही कावीळ, लिव्हर फाब्रोसिस सारख्या आजारांचे संकेत आहेत. अशा लोकांना त्वरित थकवा येतो. त्यांची पाचन क्षमता देखील कमी असते. अशा लोकांनी खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. जर तळहात पांढरे पडत असतील तर हिमोग्लोबिन किंवा रक्ताची कमी आहे.

हात थरथरणे –

अनेकवेळा हातांचे थरथरणे हे पार्किंसस आजाराचे संकेत आहेत. हे मेंदूतील व्हाइचल नर्व सेल पुर्णपणे नष्ट करते. त्यामुळे हाताला पुर्ण संकेत पोहचत नाहीत. तणावामुळे हे होऊ शकते. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment