छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी

कौन बनेगा करोडपती या सोनी टिव्हीवरील कार्यक्रमात विचारलेल्या एका प्रश्नात छत्रपती शिवाजी महाराज यांचा केवळ ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख केल्याने सोनी टिव्ही आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांना टीकेला सामोरे जावे लागले होते.

याविषयी मौन बाळगणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी आता या प्रकरणावर ट्विट करत माफी मागितली आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले की, कोणाचाही अनादर करण्याचा हेतू नव्हते. जर यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यासाठी मी माफी मागतो.

प्रोड्यूसर सिद्धार्थ बासू देखील या प्रकरणात माफी मागितली.

कार्यक्रमादरम्यान विचारण्यात आलेल्या एका प्रश्नात महाराणा प्रताप, महाराणा रणजीत सिंह आणि राणा सांगा असे पर्याय देण्यात आले होते. एवढेच काय तर विचारलेल्या प्रश्नात औरंगाजेबचा उल्लेख देखील मुघल सम्राट असा करण्यात आला होता. मात्र पर्यायामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता.

यामुळे सोनी टिव्ही आणि अमिताभ बच्चन यांच्यावर चांगलीच टीकेची झोड उठली. नेटकऱ्यांनी ट्विटरवर राग व्यक्त करत #Boycott_KBC_SonyTv असे ट्विट केले.

नेटकऱ्यांनी राग व्यक्त केल्यानंतर सोनी टिव्हीने देखील या बाबत माफी मागितली.

Leave a Comment