या ठिकाणी आढळले अंड्याच्या आकाराचे हजारो दुर्मिळ बर्फाचे गोळे

समुद्राच्या किनाऱ्या फिरताना अनेक सुंदर गोष्टी बघायला मिळतात. मात्र फिनलँडमधील एका दांपत्याला जे बघायला मिळाले, ते खूपच आश्चर्यकारक होते. फिनलँडच्या हॅलूओतो द्वीपावरील मार्जेनेमी बीचवर एका दांपत्याला हजारोंच्या संख्येत अंड्याच्या आकाराचे दुर्मिळ असे बर्फाचे गोळे दिसले. हे अंड्याच्या आकाराचे बर्फाचे गोळे समुद्राच्या किनाऱ्यावर 30 मीटर भागात पसरले होते. या गोळ्यांचे फोटो काढणाऱ्या रिस्तो मतीला यांनी सांगितले की, हे गोळे अंड्याच्या आकाराचे आहेत. सर्वात मोठा गोळा तर फुटबॉल एवढा आहे. मी यापुर्वी असे कधीच पाहिले नव्हते.

फिनिश हवामान संस्थेचे विशेषज्ञ जॉनी वेनिया म्हणाले की, ही घटना सामान्य नसून, हा चिंतेचा विषय आहे. सर्वसाधारण हवामानात अशी घटना वर्षातून एकदा होते.

इलिनोइस स्टेट युनिवर्सिटीमधील भूगोल-भूविज्ञानाचे फ्रोफेसर डॉ. जेम्स कार्टर यांच्यानुसार, शरद ऋतुमध्ये असे पाहायला मिळते. या काळात पाण्याच्या थरावर बर्फ बनण्यास सुरूवात होते. जेव्हा हवा येते, तेव्हा ही असेच होते. फोटो काढणाऱ्यांचे धन्यवाद, कारण त्यांच्यामुळे अनेकांना ही गोष्ट बघायला मिळत आहे.

 

Leave a Comment