व्हॉट्सअ‍ॅपने व्यापाऱ्यासांठी बिझनेस अ‍ॅपमध्ये आणले खास फीचर

इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने छोट्या व्यापाऱ्यांसाठी आपल्या बिझनेस अ‍ॅपमध्ये कॅटलॉग्स फीचर आणले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, कॅटलॉग्स फीचर हे मोबाईल स्टोरप्रमाणेच काम करेल. यामध्ये व्यापारी प्रोडक्टची माहिती पाहू शकतील आणि शेअर करू शकतील. याद्वारे ग्राहक आपल्या सुविधेनुसार, कधीही प्रोडक्ट शोधून त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकतात.

कंपनीचे म्हणणे आहे की, याआधी व्हॉट्सअ‍ॅपवर प्रत्येक प्रोडक्टचे वेगवेगळे फोटो शेअर करावे लागत असे आणि सतत प्रोडक्टची माहिती द्यावी लागत असे. मात्र या नवीन फीचरद्वारे ग्राहक बिझनेस अ‍ॅपमध्ये संपुर्ण कॅटलॉग बघू शकतील, ज्यात त्यांना प्रोडक्टबद्दल संपुर्ण माहिती मिळेल. हे फीचर व्यापाऱ्याला अधिक प्रोफेशनल बनवले व ग्राहकांना वेबसाइटवर जाण्याऐवजी चॅटवरच संपुर्ण माहिती मिळेल.

व्यापारी कॅटलॉगमध्ये प्रोडक्टचा कोड, फोटो, किंमत, स्पेसिफिकेशन आणि फीचर्स या सारखी महत्त्वाची माहिती देऊ शकतील. यामुळे व्यापारी आणि ग्राहकांचे स्टोरेज देखील वाचेल.

सध्या कॅटलॉग फीचर भारतासोबतच ब्राझील, जर्मनी, इंडोनेशिया, मॅक्सिको, युके आणि अमेरिका या देशात मिळेल. इतर देशांमध्ये देखील हे फीचर लवकरच रोल आउट करण्यात येईल.

Leave a Comment