या कंपनीचा धमाकेदार प्लॅन, मिळणार तब्बल 540 जीबी डेटा

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक जबरदस्त प्लॅन आणला आहे. या प्लॅनची किंमत 997 रुपये असून, या प्लॅनची खास गोष्ट म्हणजे यात युजर्सला दोन महिने मोफत आपल्या आवडीची रिंगटॉन देखील ठेवता येईल.

997 रूपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिडेट व्हॉइस कॉलिंगसोबत दररोज 3 जीबी डेटा आणि 100 एसएमएसची सुविधा मिळणार आहे. या प्लॅनचा कालावधी 180 दिवसांचा आहे. हा प्लॅन 10 नोव्हेंबरपासून सुरू होईल.

सध्या कंपनीने हा प्लॅन केवळ केरळ पुरताच मर्यादित ठेवला आहे. बीएसएनएलचे केरळमध्येच 1 कोटींपेक्षा अधिक ग्राहक आहेत. कंपनी लवकरच इतर राज्यांमध्ये देखील हा प्लॅन आणू शकते.

बीएसएनलच्या या प्लॅनची टक्कर एअरटेलच्या 998 रुपये आणि व्होडाफोन-आयडिया आणि जिओच्या 999 रुपये वाल्या प्लॅनशी असेल. या तिन्ही कंपन्यांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना मोठा कालावधी आणि भरपूर डेटा मिळत आहे.

 

Leave a Comment