स्वतःला प्रभू रामांचा वंशज सांगतो हा 21 वर्षीय तरूण

केवळ 21 वर्षांच्या वयामध्ये एखादा तरूण 20 हजार कोटींचा मालक आहे, हे ऐकायला देखील अशक्य वाटते. मात्र हे खरे आहे. केवळ एवढेच नाही तर हा तरूण स्वतःला प्रभू रामांचा वंशज असल्याचे देखील सांगतो.

(Source)

या युवकाचे नाव पद्मनाभ सिंह असून, त्याचा संबंध जयपूरच्या राजघराण्याशी आहे. तो जयपूरच्या राजघराण्याचा 303 वा वंशज आहे. तो एक मॉडेल, पोलो खेळाडू आणि ट्रेकर आहे. त्याला फिरण्याची आवड असून, सर्वात जास्त पैसे तो फिरण्यावरच खर्च करतो.

(Source)

सांगण्यात येते की, जयपूरचे महाराज भवानी सिंह प्रभू रामांचा मुलगा कुश यांचे 309 वे वंशज होते. या घराण्याशी संबंध असणाऱ्या पद्मिनी देवी यांनी स्वतः एका मुलाखतीमध्ये याबाबत सांगितले होते. याशिवाय या राजघराण्याने आपल्या अधिकृत वेबसाइटवर देखील याबाबतची माहिती दिली आहे.

(Source)

शानदार लाइफस्टालमध्ये राहणाऱ्या पद्मनाभ सिंहचे जयपूरच्या राम निवास महालात देखील स्वतःचे अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये गरजेच्या सर्व गोष्टी आहेत.

(Source)

2011 मध्ये या राजघराण्याची एकूण संपत्ती 44 अब्ज रूपये एवढी होती. जी आता वाढून 44 अब्ज रूपयांपेक्षा अधिक झाली आहे.

Leave a Comment