सावधान ! हनीट्रॅपसाठी केला जात आहे 150 सोशल मीडिया प्रोफाईल्सचा वापर

सैन्याने सोशल मीडियावर 150 प्रोफाईल्सबद्दल आपल्या अधिकाऱ्यांना सतर्क केले आहे. या प्रोफाईल्सचा वापर सवेंदनशील माहिती काढून घेण्यासाठी म्हणजेच हनीट्रॅपसाठी करण्यात येत आहे.

सैन्यातील अधिकाऱ्यांना मागील 1 महिन्यापासून याविषयी माहिती देण्यात येत असून, त्यांना सावध करण्यात आले आहे. पाकिस्तानी एजेंट विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फेक प्रोफाईलचा वापर करून, सैनिक, त्यांचे कुटूंब याशिवाय निवृत्त सैन्य कर्मचारी यांना देखील निशाणा बनवले जात आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की, हे फेक प्रोफाईल 2-3 वर्ष जुने असतात. त्यामुळे याविषयी शंका उत्पन्न होत नाही. अधिकाऱ्यांना या जाळ्यात अडकू न देणे हे देखील एक आवाहन आहे. फेक प्रोफाईलचा वापर करून अधिकाऱ्यांशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या 150 प्रोफाईल्सची ओळख पटवणे हे महत्त्वाचे पाऊल असेल.

राजस्थान पोलिसांनी काही दिवसांपुर्वीच सैन्याचे एका जवानाला अटक केली आहे. हा जवान आयएसआय एजेंटच्या जाळ्यात अडकला होता. त्याला फेसबुक आणि व्हॉट्सअॅपद्वारे जाळ्यात अडकविण्यात आले होते.

 

Leave a Comment