ट्रम्प यांना न्यायालयाने ठोठावला 2 मिलियन डॉलरचा दंड

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना एका न्यायालयाने 2 मिलियन डॉलरचा दंड लावला आहे. ट्रम्प यांनी आपल्या चॅरिटी फाउंडेशनचा पैसा 2016 मध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी खर्च केला होता.

ट्रम्प यांच्याविरोधात खटला दाखल करणारे न्युयॉर्कचे अटॉर्नी जनरल लेटिटिया जेम्मस म्हणाले की, 2016 च्या राष्ट्रपती निवडणुकीत ट्रम्प यांनी चॅरिटी संस्थेचा पैसा चुकीच्या पद्धतीने प्रचारासाठी खर्च केला होता. यामुळे त्यांना 2 मिलियन डॉलरचा दंड ठोठवण्यात येत आहे.

जून 2018 मध्ये ट्रम्प फाउंडेशनवर आरोप करण्यात आला होता की, याचा पैसा 2016 च्या निवडणुकीत खाजगी, व्यापारिक आमि राजकीय हितासाठी वापरण्यात आला आहे. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान ट्रम्प यांनी हे आरोप स्विकारले होते.

न्यायालयाने निकाल देताना ट्रम्प फाउंडेशन बंद करण्याचा आणि फाउंडेशनचा बाकी फंड (जवळपास 17 लाख डॉलर) इतर संस्थांमध्ये वाटण्यात यावे, असे आदेश दिले आहेत.

 

Leave a Comment