तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी झाली होती नोटबंदी


नवी दिल्ली – देशाच्या अर्थव्यवस्थेच्या इतिहासातील आठ नोव्हेंबरचा दिवस एक महत्त्वाचा दिवस असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच दिवशी तीन वर्षांपूर्वी रात्री आठ वाजता दूरदर्शनवरून देशाला संबोधित केले होते. मोदींनी या दिवशी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. देशातील काळा पैसा आणि नकली नोटांची समस्या संपवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले.

त्या दिवशी रात्री 12 वाजल्यापासून नोटबंदीचा निर्णय लागू झाला होता. काही दिवस यामुळे देशामध्ये गोंधळाचे वातावरण होते. बँकांच्या बाहेर लांबच-लांब रांगा लागलेल्या होत्या. यानंतर 500 आणि 2000 च्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या. काही दिवसांनी 200, 100, 50 आणि 10 रुपयांच्याही नव्या नोटा जारी झाल्या. पण 100, 50 आणि 10 रुपयांच्या जुन्या नोटा रद्द झाल्या नाहीत.

Leave a Comment