स्वस्त होणार स्टेट बँकेचे होमलोन आणि पर्सनल लोन


मुंबई : आपल्या असंख्या ग्राहकांना दिलासा देत सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने एक मोठी घोषणा केली आहे. 10 नोव्हेंबरपासून MCLR चे दर एसबीआयने 0.05 टक्क्यांनी कमी केल्यामुळे होमलोन, ऑटोलोन आणि पर्सनल लोन स्वस्त होणार आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेने याआधी रेपो रेट कमी केल्यानंतर एसबीआयने MCLR चे दर 0.10 टक्क्यांनी कमी केले होते. आता एक वर्षासाठी या बँकेने MCLR चे दर 8.05 टक्क्यांवरून 8 टक्क्यांवर आणले आहेत. बँकेने या आर्थिक वर्षात सलग सातव्यांदा हे दर कमी केले आहेत.

MCLR मध्ये वाढ किंवा कपात बँकेने केली तर त्याचा थेट परिणाम नवे कर्ज घेणाऱ्या ग्राहकांबरोबरच आणखीही ग्राहकांवर होतो. ज्यांनी एप्रिल 2016 मध्ये कर्ज घेतले आहे त्यांनाही याचा फायदा किंवा तोटा होऊ शकतो. त्यामुळे एसबीआयचे होमलोन, ऑटोलोन आणि पर्सनल लोन स्वस्त झाल्यानंतर त्याचा अनेक ग्राहकांना फायदा होऊ शकतो. त्यामुळेच स्टेट बँक ऑफ इंडियाची ही घोषणा महत्त्वाची आहे.

Leave a Comment