सरकारने काढली गांधी कुटूंबियांची एसपीजी सुरक्षा

केंद्र सरकारने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांची एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन फोर्स) सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पुर्ण गांधी कुटूंबाला एसपीजी सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती.

गृहमंत्रालयाच्या सुरक्षा समिक्षा कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच एसपीजी सुरक्षा मिळेल. आता गांधी कुटूंबाला एसपीजी ऐवजी सीआरपीएफची झेड प्लस सुरक्षा देण्यात येईल.

गृहमंत्रालयाच्या बैठकीत गांधी कुटूंबाच्या सुरक्षेविषयी समिक्षा करण्यात आली. यामध्ये गांधी कुटूंबाला अधिक धोका नसल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांची एसपीजी सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. देशातील ज्या मोठ्या व्यक्तींच्या जीवाला धोका उत्पन्न शक्यता असते, अशांना एसपीजी सुरक्षा देण्यात येते.

काँग्रेसकडून सरकारच्या या निर्णयावर टीका करण्यात येत आहे. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी सरकारचा निर्णय अयोग्य असल्याचे म्हटले आहे.